विविध स्पर्धा परीक्षांमध्ये सामान्य ज्ञानावर (General knowledge question) आधारित प्रश्न विचारले जातात. हे प्रश्न राज्य ,राष्ट्र व जागतिक स्तरावरचे सुद्धा विचारले जातात. आज आपण अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्न बघणार आहोत.
General knowledge questions in marathi
जनरल नॉलेज प्रश्न
* पृथ्वीला सर्वात जवळ असलेला ग्रह कोणता ?
⇒ शुक्र
* उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस कोणता ?
⇒ 21 जून
* जनगणमन या राष्ट्रगीताचा कर्ता कोण ?
⇒ रवींद्रनाथ टागोर
* महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य कोणते ?
⇒ कर्नाळा (रायगड)
* महाराष्ट्रातील सर्वाधिक साखर कारखाने असणारा जिल्हा कोणता ?
⇒ अहमदनगर
* महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका कोणती ?
⇒ मुंबई
* महाराष्ट्रातील पहिली सैनिकी शाळा कोणती ?
⇒ सातारा ( 1961)
* महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी कोणत्या नदीला म्हणतात ?
⇒ कोयना
* महाराष्ट्रामध्ये हिवाळी अधिवेशन कोठे भरते ?
⇒ नागपूर
* भारतातील सर्वात मोठे वाळवंट कोणते ?
⇒ थर वाळवंट (राजस्थान)
* भारतातील सर्वात लांब धरण कोणते ?
⇒ हीराकुंड
* सात बेटांचे शहर कोणत्या शहराला म्हणतात ?
⇒ मुंबई
* शीश महल कोठेआहे?
⇒ इंदौर (मध्य प्रदेश)
* गोल घुमट कोठे आहे ?
⇒ विजापूर
* भारतातील सर्वात मोठा लष्करी सन्मान कोणता ?
⇒ परमवीर चक्र
* भारतातील सर्वात मोठा नागरी सन्मान कोणता ?
⇒ भारतरत्न
* खजुराहो लेणी कोणत्या राज्यात आहे ?
⇒ मध्य प्रदेश
* कर्नाटक राज्याचा प्रमुख नृत्य प्रकार कोणता ?
⇒ यक्षगान
* हजारीबाग अभयारण्य कोणत्या राज्यात आहे ?
⇒ झारखंड
* सुंदरबन अभयारण्य कोणत्या राज्यात आहे ?
⇒ पश्चिम बंगाल
* सुरत हे शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे ?
⇒ तापी
* दिल्ली हे शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे ?
⇒ यमुना
* 2011 च्या जनगणनेनुसार भारतात सर्वात जास्त स्त्रियांचे प्रमाण असलेले राज्य कोणते ?
⇒ केरळ
* भारताचे ध्येय वाक्य कोणते ?
⇒ सत्यमेव जयते
* बुलंद दरवाजा कोठे आहे ?
⇒ फत्तेपूर शिक्री
General knowledge questions in marathi
* पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्याचा काय म्हणतात ?
⇒ पृथ्वीचे परिभ्रमण
* सर्वात मोठा ग्रह कोणता?
⇒ गुरु
* पृथ्वीवरील सर्वात मोठा खंड कोणता ?
⇒ आशिया
* पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्यास काय म्हणतात?
⇒ पृथ्वीचे परिवलन
* सहा महिने दिवस व सहा रात्र असणारा प्रदेश कोणता ?
⇒ टुंड्रा प्रदेश
* जगातील सर्वात लांब नदी कोणती ?
⇒ नाईल
* सूर्यापासून येणारी अतिनील किरणे ...........थरात शोधली जातात.
⇒ ओझोन
* जगातील सर्वात मोठा महासागर कोणता ?
⇒ पॅसिफिक महासागर
* उगवत्या सूर्याचा देश कोणत्या देशाला म्हणतात ?
⇒ जपान
* संयुक्त राष्ट्र संघटनेचे मुख्यालय कोठे आहे ?
⇒ न्यूयार्क (अमेरीका)
* आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेचे मुख्यालय कोठे आहे?
⇒ जिनिव्हा
General knowledge questions in marathi
* सारे जहासे अच्छा हिंदुस्तान हमारा हे गीत कोणी लिहिले ?
⇒ सर महम्मद इक्बाल
* जालियनवाला बाग हत्याकांड कोणत्या शहरात घडले ?
⇒ अमृतसर
* भारताचे पितामह कोणाला म्हणतात ?
⇒ दादाभाई नवरोजी
* महात्मा गांधींना महात्मा ही उपाधी कोणी दिली ?
⇒ सुभाषचंद्र बोस
* पहिली भारतीय महिला काँग्रेस अध्यक्षा कोण ?
⇒ सरोजिनी नायडू
* स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक कोणाला म्हणतात ?
⇒ लॉर्ड रिपन
* कर्जन वायलीचा खून कोणी केला ?
⇒ मदनलाल धिंग्रा
* महात्मा गांधींनी सत्याग्रहाचा पहिला यशस्वी प्रयोग कोठे केला ?
⇒ दक्षिण आफ्रिकेत
* शांतिनिकेतन ची स्थापना कोणी केली ?
⇒ रवींद्रनाथ टागोर
General knowledge questions in marathi
* घटना समितीचे अध्यक्ष कोण होते ?
⇒ डॉ. राजेंद्र प्रसाद
* घटनेच्या कोणत्या कलमानुसार राष्ट्रपतीची निवड केली जाते?
⇒ कलम 54
* एकाच वेळी राष्ट्रपती व उपराष्ट्रपती हे दोन्ही पदे रिकामी झाल्यास राष्ट्रपती म्हणून कोणाची निवड केली जाते ?
⇒ सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश
* राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण ?
⇒ उपराष्ट्रपती
* संसदेचे कनिष्ठ सभागृह कोणते ?
⇒ लोकसभा
* संसदेचे वरिष्ठ सभागृह कोणते ?
⇒ राज्यसभा
खालील टेस्ट सोडवा
सामान्य ज्ञान टेस्ट -1
सामान्य ज्ञान टेस्ट -1
0 Comments