New update

6/recent/ticker-posts

NMMS exam syllabus in Marathi

NMMS exam syllabus  in Marathi

इयत्ता ८ वीच्या अखेर आर्थिक दुर्बल घटकातील प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन बुध्दिमान विद्यार्थ्यांना सर्वोत्तम शिक्षण मिळण्याच्या दृष्टीने त्यांना आर्थिक सहाय्य करावे, त्यानुसार विद्यार्थ्यांचे उच्च माध्यमिक स्तरापर्यंतचे शिक्षण घेण्यास मदत व्हावी. आर्थिक दुर्बलतेमुळे प्रज्ञावान विद्यार्थ्यांची उच्च माध्यमिक स्तरापर्यंत होणारी गळती रोखावी हे या NMMS परीक्षा घेण्याचा मुख्य हेतु आहे.

                 

परीक्षा स्वरूप : NMMS या परीक्षेत दोन पेपर असतील.


अ.क्र विषय एकूण गुण एकूण प्रश्न वेळ
1 बौद्धिक क्षमता चाचणी Mental Ability Test ( MAT ) 90 90 दीड तास ( फक्त दृष्टी अपंगासाठी 30 मिनिटे जादा वेळ देण्यात येईल )
2 शालेय क्षमता चाचणी Scholastic Aptitude Test ( SAT ) 90 90 दीड तास ( फक्त दृष्टी अपंगासाठी 30 मिनिटे जादा वेळ देण्यात येईल )

NMMS परीक्षा अभ्यासक्रम : NMMS exam Syllabus In Marathi

परीक्षेसाठी विषय सदर परीक्षेसाठी २ विषय असतील.

A) बौध्दिक क्षमता चाचणी :- ही मानशास्त्रीय चाचणी असून, त्यामध्ये कार्यकारणभाव, विश्लेषण, संकलन इत्यादी संकल्पनांवर आधारित ९० बहुपर्यायी वस्तुनिष्ठ प्रश्‍न असतात.
B) शालेय क्षमता चाचणी :- ही सामान्यत: इयत्ता ८ वी पर्यंतच्या अभ्यासक्रमांवर आधारित असेल. त्यामध्ये
१. सामान्य विज्ञान एकूण (गुण-३५)
२. समाजशास्त्र (एकूण गुण -३५)
३. गणित (एकूण गुण - २०)
असे तीन विषय असतील.या तीन विषयांचे एकूण ९० प्रश्‍न सोडवायचे असतात.
* उपविषयावर गुणांची विभागणी खालीलप्रमाणे असेल.
सामान्य विज्ञान ३५ गुण :- भौतिकशास्त्र ११ गुण, रसानशास्त्र ११ गुण, जीवशास्त्र १३ गुण.
. समाजशास्त्र ३५ गुण :- इतिहास १५ गुण, नागरिकशास्त्र ०५ गुण, भूगोल १५ गुण
गणित २० गुण,

NMMS परीक्षा माध्यम :- प्रश्‍नपत्रिका मराठी, इंग्रजी, हिंदी, गुजराथी, उर्दू, सिंधी, कन्नड व तेलुगू या आठ माध्यमातून उपलब्ध असतील.(सर्व विद्यार्थ्यांना मूळमाध्यमाबरोबर इंग्रजी माध्यमाची प्रश्‍नपत्रिका एकत्र देण्यात येणार आहे.) यापैकी कोणतेही एकच माध्यम घेता येईल. दोन्ही प्रश्‍नपत्रिकांसाठी स्वतंत्र उत्तरपत्रिका दिल्या जातील. प्रत्येक प्रश्‍नक्रमांकापुढे पर्यायांसाठी ४ वुर्तळे असतील. योग्य पर्यायाचे वर्तळ निळे/काळे बॉलपेनने पूर्णत: रंगवून उत्तर नोंदवायचे आहे. पेन्सिलचा वापर केलेली/अपुरी/अशंत: रंगवलेली उत्तरे यांना गुण दिले जाणार नाहीत. एकापेक्षा अधिक वुर्तळात नोंदविलेली/उत्तरे/चुकीच्या पध्दतीने नोंदवलेली उत्तरे/व्हाईटनर/खाडाखोड करुन नोंदविलेली किंवा गिरवलेली उत्तरे यांना गुण दिले जाणार नाहीत.

हे सुद्धा वाचा 

NMMS परीक्षा संपूर्ण माहिती 

Post a Comment

0 Comments