विशेषण व विशेषणाचे प्रकार
Table of Contents
1.विशेषणाची व्याख्या
2. विशेषणाचे प्रकार
3.गुणविशेषण
4.संख्याविशेषण
5.सार्वनामिक विशेषण
विशेषणाची व्याख्या : नामाबद्दल विशेष माहिती सांगणार्या शब्दाला ' विशेषण ' असे म्हणतात.
उदा: 1) हिरवे रान 2) चांगली मुले
विशेषण : हिरवे , चांगली
विशेषणाचे प्रकार :
विशेषणाचे मुख्य तीन प्रकार आहेत.
1) गुणविशेषण
2) संख्याविशेषण
3) सार्वनामिक विशेषण
1) गुणविशेषण : जे विशेषण नामाचा कोणत्याही प्रकारचा गुण किंवा विशेष दाखविते त्यास ' गुणविशेषण ' म्हणतात.
उदा. * आंबट बोरे
* शूर सरदार
* शुभ्र ससा
2) संख्याविशेषण : जे विशेषण नामांची संख्या दाखविते त्या ' संख्याविशेषण ' म्हणतात.
* संख्याविशेषणाचे पाच प्रकार आहेत.
1) गणनावाचक संख्याविशेषण
2)क्रमवाचक संख्याविशेषण
3) आवृत्तीवाचक संख्याविशेषण
4) पृथकत्ववाचक संख्याविशेषण
5)अनिश्चित संख्याविशेषण
1) गणनावाचक संख्याविशेषण : ज्या विशेषनाचा उपयोग गणना किंवा गणती करण्यासाठी होतो त्यास ' गणनावाचक विशेषण ' म्हणतात.
उदा. * चौदा भाषा
* साठ रुपये
* दोघे भाऊ
* गणनावाचक संख्याविशेषनाचे तीन उपप्रकार आहेत.
1) पूर्णांक वाचक : एक , दोन ,तीन
2) अपूर्णांक वाचक : पाव, अर्धा, पाऊण
3)साकल्यवाचक: दोन्ही भाऊ, पाची पांडव
2)क्रमवाचक संख्याविशेषण : ज्या विशेषणाचा उपयोग वाक्यातील वस्तूचा क्रम दाखवण्यासाठी केला जातो त्यास 'क्रमवाचक संख्याविशेषण ' म्हणतात.
उदा. * दूसरा वर्ग
* पाचवे वर्ष
* चौथा बंगला
3) आवृत्तीवाचक संख्याविशेषण : जी विशेषणे वाक्यात संख्येची किती वेळा आवृत्ती झाली हे दाखवितात त्यांना ' आवृत्तीवाचक संख्याविशेषणे म्हणतात.
उदा : * तिप्पट पैसे
* दुहेरी रंग
* चौपट मुले
4) पृथकत्ववाचक संख्याविशेषण : जी विशेषणे वेगवेगळा असा बोध करून देतात त्यांना ' पृथकत्ववाचक संख्याविशेषण ' असे म्हणतात.
उदा. * एकेक मुलगा
* दहा- दहांचा गट
5) अनिश्चित संख्याविशेषण : जी विशेषणे निश्चितपणे संख्या दाखवीत नाही त्यांना ' अनिश्चित संख्याविशेषणे ' असे म्हणतात.
उदा. * काही माणसे
* सर्व मुली
* थोडी मुले
3) सार्वनामिक विशेषण : सर्वनामापासून तयार झालेल्या विशेषणाना ' सार्वनामिक विशेषणे ' असे म्हणतात.
उदा. * तो प्राणी
* हा मुलगा
* माझे घर
0 Comments