साने गुरुजी Sane guruji information in Marathi
साने गुरुजी यांचे पूर्ण नाव पांडुरंग सदाशिव साने होते. साहित्यिक, कार्यकर्ता, शिक्षक, व कुटुंब घटक अशा विविध भूमिकेतून आपले कार्य उत्तमपणे निभावणारे अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणजे साने गुरुजी. साने गुरुजी यांच्या जीवनविषयी बोलावे तर शब्द कमी पडतील असा त्यांचा जीवन प्रवास आहे.
साने गुरुजी जीवन परिचय
पूर्ण नाव | पांडुरंग सदाशिव साने |
---|---|
जन्म | 24 डिसेंबर 1899 |
जन्मगाव | पालगड (रत्नागिरी) |
वडीलाचे नाव | सदाशिव साने |
आईचे नाव | यशोदाबाई साने |
मृत्यू | 11 जून 1950 |
साने गुरुजींचे बालपण
साने गुरुजींचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील लहानशा गावी झाला. त्यांचा जन्म अत्यंत गरीब कुटुंबात झाल्यामुळे लहानपणापासूनच त्यांना गरीबीचे चटके सहन करावे लागले. साने गुरुजींना संस्कारक्षम बनविण्यामध्ये त्यांच्या आईचा वाटा मोलाचा आहे. त्यांच्या आईने गरीबाविषयी साने गुरुजीच्या मनात दया, करुणा जागरूक केली त्यामुळे लहानपासून ते गरीबांना मदत करायला शिकले. साने गरुजींना शालेय वयातच वाचनाची आवड लागली. त्यांनी अनेक कथा, कादंबर्या, थोरांची चरित्रे, लहान वयातच वाचून काढली त्यामुळे त्यांची बुद्धी अधिक तीव्र होत गेली.
साने गुरुजींचा जीवन प्रवास
साने गुरुजी उत्तम वाचक असल्यामुळे त्यांनी गोपाळकृष्ण गोखले, लोकमान्य टिळक यांची जीवनचरीत्रे वाचून काढली. त्यामुळेच त्यांच्या मनात भारताच्या स्वातंत्र्याविषयी देशभक्ती जागरूक होऊ लागली. साने गुरुजींना स्वत: वाचनाची आवड तर होतीच त्याचबरोबर त्यांना शिकविण्याची सुद्धा आवड होती. त्यामुळचे त्यांनी अमळनेर च्या प्रताप हायस्कूल मध्ये विद्यार्थ्यांना शिकविण्याचे काम सुरू केले. त्यांच्या प्रेमळ स्वभावामुळे ते विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून प्रसिद्ध झाले.
साने गुरुजींनी खानदेशातील गरीब मुलांसाठी वसतिगृह चालविताना सुद्धा त्यांनी मुलांना आईचे प्रेम दिले. धुळे जेलमध्ये असतांना ते कैद्यांचा अभ्यासवर्ग घेत असत. त्यामुळेच त्यांचे सहकारी त्यांना ' गुरुजी ' असे म्हणू लागले. जेलमधून सुटल्यानंतरसुद्धा त्यांनी स्वातंत्र मिळविण्यासाठी कार्य करण्याचे ठरविले होते.
भारताच्या स्वातंर्यासाठी आंदोलन करतांना पुन्हा एकदा त्यांना 1932 मध्ये नाशिकच्या जेल मध्ये ठेवण्यात आले होते. तेथे सुद्धा ते रोज रात्री कैद्यांना त्यांच्या आठवणी सांगत असे. त्यामधुनच ' श्यामची आई ' हे अविस्मरणीय पुस्तक तयार झाले. 1936 मध्ये फैजपुर येथे भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस अधिवेशन झाले होते तेथे साने गुरुजींनी भाषण केले त्यामुळे हजारो तरुण त्यांचे स्वयंसेवक बनण्यासाठी तयार झाले होते. काहीजणांना वाटत होते की साने गुरुजींना अधिवेशनाचे अध्यक्ष करावे. पण त्यावर साने गुरुजी म्हणाले की, " मी नेता नाही. मी एक नम्र सेवक आहे. अधिवेशनाच्या जागी स्वच्छता गृहाच्या सफाईच्या कामाचा मी प्रमुख होईन. " व साने गुरुजींनी तेच केले. सफाई हे साने गुरुजींचे आवडते काम होते.
साने गुरुजी गांधीवादी विचारसारणीचे होते. म. गांधीवर त्यांची नितांत श्रद्धा होती. म. गांधीच्या हत्येनंतर त्यांनी 21 दिवसांचे निर्जल उपोषण केले होते. 11 नोव्हेंबर 1947 रोजी पंढरपूर येथील मंदिर हरिजनसाठी खुले करण्यासाठी त्यांनी प्राणांतिक उपोषण केले होते. व शेवटी त्यांनी हरिजनांना मंदिर प्रवेश मिळवून दिला.
विनोबांनी साने गुरुजींचा ' अमृतपुत्र ' म्हणून गौरव केला आहे. 11 जून 1950 ला वयाच्या 51 व्या साने गुरुजींचा मृत्यू झाला.
* साने गुरुजींविषयी महत्वाचे
* साने गुरुजींचा जन्म रत्नागिरीतील ' पालगड ' या गावी झाला.
* ' मृत्युचे चुंबन घेणारा महाकवी ' या शब्दात साने गुरुजींचे वर्णन आचार्य अत्रे यांनी केले.
*साने गुरुजींचा पहिला काव्यसंग्रह - पत्री
* साने गुरुजींनी ' छात्रालय ' हे वृत्तपत्र सरू केले होते.
* साने गुरुजी यांनी 1928 मध्ये ' विद्यार्थी ' हे मासिक सुरू केले होते.
* ' बलसागर भारत होवो, विश्वात शोभूनी राहो ' ही कविता साने गुरुजी यांनी लिहिली.
* ' आंतरभारती ' हे कुणाचे आवडते स्वप्न होते ? - साने गुरुजी
* 'फुलापरी या जगात सुंदर एक मूल हसरे ' असे मुलांविषयी कोण म्हणत ?- साने गुरुजी
* कॉंग्रेस (1938) व साधना(1948) ही साप्ताहिके साने गुरुजींनी सुरू केली होती.
साने गुरुजी यांची साहित्यसंपदा
* श्यामची आई
* श्याम
* स्त्री जीवन
* पक्षी
* भारतीय संस्कृती
*क्रांति
*धडपडणारी मुले
*गोड गोष्टी
*सुंदर पत्रे
*पणती
0 Comments