New update

6/recent/ticker-posts

सर्वनाम व सर्वनामाचे प्रकार

सर्वनाम (Pronoun)

           शब्दाच्या आठ जातीपैकी सर्वनाम ही एक जात आहे. 

sarvnam va tyache prakar.सर्वनाम व त्याचे प्रकार sarvnam va tyache prakar . sarvnam in marathi. sarvanam mhanje kay in marathi
sarvanam che udaharan in marathi sarvanam exampl


सर्वनामाची व्याख्या (Definition of pronouns): 

                             "नामाच्या ऐवजी वापरल्या जाणार्‍या विकारी शब्दाला सर्वनाम असे म्हणतात."

उदा :  1)  राम सुंदर दिसतो.
           2) तो सुरेख गातो. 
          वरील वाक्य क्र. मध्ये 'राम' हे नाम असून, वाक्य क्र. 2 मध्ये  'तो' हे    सर्वनाम आहे. 
 

सर्वनामाचे प्रकार (Types of pronouns):

                   सर्वनामाचे एकूण 6 प्रकार आहेत. 
1) पुरुषवाचक सर्वनाम 
2) दर्शक सर्वनाम 
3)संबंधी सर्वनाम
4)प्रश्नार्थक सर्वनाम 
5)अनिश्चित सर्वनाम 
6)आत्मवाचक सर्वनाम 

1) पुरुषवाचक सर्वनामे : पुरुषवाचक सर्वनामाची  तीन गटात विभागणी होते.

अ) प्रथम पुरुषवाचक सर्वनामे : स्वतं: विषयी बोलण्यासाठी  जी सर्वनामे वापरली जातात त्यांना 'प्रथम पुरुषवाचक सर्वनामे'  म्हणतात. 
उदा : मी, आम्ही, आपण स्वतं: 
*मी बाजारातून आलो. 

ब) व्दितीय पुरुषवाचक सर्वनामे : समोरच्या व्यक्तिशी बोलण्यासाठी जी सर्वनामे  वापरली  जातात  त्यांना   'द्वितीय  पुरुषवाचक सर्वनामे' म्हणतात. 
उदा. तू, तुम्ही, आपण स्वत: 
* तू आता अभ्यास कर. 


क) तृतीय पुरुषवाचक सर्वनामे : ज्याच्याविषयी बोलायचे  आहे त्याचा उल्लेख करताना जी सर्वनामे वापरली जातात त्यांना 'तृतीय पुरुषवाचक' सर्वनामे म्हणतात. 
उदा. तो, ती, ते, त्या 
*तो खूप सुंदर दिसतो. 
 

2) दर्शक सर्वनामे :  जवळची किंवा  दूरची वस्तू दाखवण्यासाठी जी सर्वनामे वापरली जातात त्यांना 'दर्शक सर्वनामे   म्हणतात. 
उदा.  हा, ही, हे, तो, ती, ते, 
* हा माझा मोबाइल आहे . 

3) संबंधी सर्वनामे : वाक्यत पुढे येणार्‍या दर्शक सर्वनामाशी संबंध दाखविणार्‍या सर्वनामाना 'संबंधी सर्वनामे' असे म्हणतात.
उदा. जो-जी-जे, जे -ज्या 
* जे चकाकते ते सोने नसते. 

4) प्रश्नार्थक सर्वनामे : ज्या सर्वनामाचा उपयोग वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी होतो, त्यांना 'प्रश्नार्थक सर्वनामे' म्हणतात. 
उदा. कोण, काय, कोणास, कोणाला, कोणी
* तुला काय पाहिजे ?

5) सामान्य सर्वनामे किंवा अनिश्चित सर्वनामे : कोण, काय ही सर्वनामे वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी न येता ती कोणत्या नामाबद्दल आली आहेत हे निश्चितपणे सांगता येत नाही, तेव्हा त्यांना 'अनिश्चित सर्वनामे' असे म्हणतात. 
 उदा. तुला काय हवे ते घेऊन जा. 

6)आत्मवाचक सर्वनामे : 'आपण' या सर्वनामाचा अर्थ जेव्हा  'स्वत:' असा होतो, तेव्हा ते 'आत्मवाचक सर्वनाम ' असते.
उदा. तो आपणहून माझ्याकडे आला. 


Must read (नक्की वाचा)
नाम व नामाचे प्रकार

Post a Comment

0 Comments