गणित सराव टेस्ट (Math practice test ) संख्याज्ञान, लसावि-मसवि, काळ-काम-वेग, सरासरी, शेकडेवारी, गुणोत्तर इत्यादि घटकावर आधारित प्रश्न विचारण्यात आले आहे. या चाचणीमध्ये एकूण 10 प्रश्न दिलेले आहेत. आणि चाचणी सोडविल्यानंतर चाचणीच्या शेवटी तुमचा निकाल दिलेला आहे.
विद्यार्थी मित्रांनो www.abhyaskatta.com वर इतर विषयाच्या सुद्धा टेस्ट दिलेल्या आहे त्या टेस्ट पण तुम्ही सोडवू शकता.
टेस्ट सोडवण्यासाठी खालील स्टार्ट बटणावर क्लिक करा.
Q.1 1,2,3 हे अंक प्रत्येक संख्येत एकदाच वापरुन 200 पेक्षा मोठ्या अशा किती संख्या तयार होतील ?
Q.2 तीन मूळ संख्यांचा गुणाकार 1001 आहे; तर त्यापैकी सर्वात लहान मूळ संख्या कोणती ?
Q.3 एका पुस्तकाचा 4/7 भाग व 20 पाने वाचून झाल्यावर 64 पाने वाचावयाची शिल्लक राहिली, तर त्या पुस्तकात एकूण पाने किती असतील ?
Q.4 दोन संख्यांची बेरीज 60 आहे, तर त्या प्रत्येक संख्येची चौपट करून बेरीज केल्यास; उत्तर काय येईल ?
Q.5 एका वर्गातील 40 विद्यार्थ्याचे सरासरी वय 12.5 वर्षे आहे. वर्गशिक्षकासह सर्वांचे सरासरी वय 13 वर्षे झाल्यास, वर्गशिक्षकाचे वय किती ?
Q.6 दोन संख्यांचा गुणाकार 486 व ल.सा.वि.54 आहे, तर त्यापैकी मोठी संख्या कोणती ?
Q.7 300 मीटर लांबीच्या ताशी 72 किमी वेगाने जाणार्या आगगाडीला एक विजेचा खांब ओलांडण्यास किती वेळ लागेल ?
Q.8 एक पाण्याची टाकी एका नळाने 8 तासात भरते. तर दुसर्या नळाने 4 तासात रिकामी होते. दोन्ही नळ एकाच वेळी चालु केले; तर भरलेली टाकी किती तासात रिकामी होईल ?
Q.9 24 मिनिटाचे 72 सेकंदाशी असलेले गुणोत्तर किती ?
Q.10 2400 पैकी 144 = किती टक्के ?
0 Comments