New update

6/recent/ticker-posts

नाम व नामाचे प्रकार







नाम

 शब्दांच्या एकूण आठ जाती आहेत त्यापैकी नाम ही एक जात आहे. आज आपण प्रथम नामाची व्याख्या समजून घेऊया त्यानंतर  नामाचे प्रकार बघूया. 


नामाची व्याख्या : " सृष्टीमध्ये अस्तित्वात असलेल्या किंवा काल्पनिक असणाऱ्या प्रत्येक घटकाला किंवा त्यांच्या गुणधर्माला दिलेले नाव म्हणजे नाम होय."


* Must read ( नक्की वाचा )

नामाचे प्रकार

नामाचे मुख्य तीन प्रकार आहेत ते पुढील प्रमाणे :

1) सामान्य नाम :  ज्या नामातून संपूर्ण जातीचा बोध होतो त्या नामास ' सामान्य नाम ' असे म्हणतात.
उदा. नदी, शाळा, माणूस , घर, मुलगी, ग्रह
 
सामान्यनामाचे दोन उपप्रकार आहेत. ते पुढीलप्रमाणे :

अ) समुदायवाचक  नाम :  ज्या नामातून संपूर्ण समुहाचा बोध होतो त्या नामास ' समुदायवाचक  नाम 'असे म्हणतात .
उदा. सैन्य, वर्ग, कळप.

ब) पदार्थ वाचक नाम :  जे पदार्थ संख्येशियाय इतर परिमानांनी मोजले जातात ,अशा  पदार्थांना दिलेल्या नावांना  ' पदार्थवाचक नाम  'असे म्हणतात. 
उदा. सोने ,तूप , साखर, पीठ 

2) विशेष नाम :  एखाद्या नामातून एका विशिष्ट व्यक्तीचा , प्राण्याचा किंवा वस्तूचा बोध होत असेल तर अशा नामास  'विशेष नाम' असे म्हणतात. विशेष नामातून फक्त एकाच घटकाचा बोध होतो म्हणजेच विशेष नाम हे एक वचनी असते.

उदा. गंगा, मुंबई , राम , हिमालय , भारत


3) भाववाचक नाम : प्रत्यक्षात असलेल्या किंवा काल्पनिक असणाऱ्या वस्तू किंवा प्राणी  यांच्या गुण, धर्म किंवा भाव यांना जे नाव दिले जाते त्याला 'भाववाचक नाम 'असे म्हणतात.

उदा. सौंदर्य, श्रीमंती , मनुष्यत्व, शहाणपणा

खालील उदाहरणे अभ्यासा ......

1) 'माकड ' झाडावर चढले .
 उत्तर : याठिकाणी  'माकड'  हे नाम संपूर्ण माकडची जात दर्शविते म्हणून ते 'सामान्य नाम ' आहे. 

2) गंगा नदीचे पाणी अत्यंत स्वच्छ आहे. 
उत्तर : याठिकाणी  'गंगा' हे नाम गंगा नावाच्या विशिष्ट नदीसाठी वापरले आहे . म्हणून ते  ' विशेषनाम ' आहे. 

2)' प्रामाणिकपणा '   हे कोणत्या प्रकारचे नाम आहे ? 
उत्तर : प्रामाणिकपणा हे नाम  गुण दर्शविते म्हणून ते भाववाचक नाम आहे .

* Must solve ( नक्की सोडवा )

Post a Comment

0 Comments