स्पर्धा परीक्षेमध्ये गणित (math) विषय खूप महत्वाचा आहे. गणित हा स्कोअरिंग करणारा विषय आहे. विद्यार्थी मित्रांनो तुम्ही गणित विषयात अगदी पैकीच्या पैकी मार्क मिळवू शकता.परंतु त्यासाठी तुम्हाला गणित विषयाचा जास्तीत सराव करावा लागेल. तुमचा गणित विषयाचा जास्तीत जास्त सराव व्हावा त्यासाठी मी खाली गणिताची 10 प्रश्नांची सराव चाचणी दिलेली आहे ती तुम्ही सोडवा. विद्यार्थी मित्रांनो www.abhyaskatta.com वर गणिताबरोबरच इतर विषयाच्या सुद्धा टेस्ट दिलेल्या आहे त्या टेस्ट पण तुम्ही सोडवू शकता.
टेस्ट सोडविण्यासाठी खालील स्टार्ट बटणावर क्लिक करा .
Q.1 दोन संख्यांची बेरीज 96 आहे व वजाबाकी 24 आहे तर त्यांचे गुणोत्तर किती ?
Q.2 1 ते 101 पर्यंतच्या अंकाची सरासरी किती ?
Q.3 20 - 5 × 2 + 3 - 18 ÷ 9 = ?
Q.4 एक रेल्वे 100 मी. लांब पूलाला 45 किमी/तास वेगाने गेल्यास 60 सेकंदात ओलांडते, तर ती एक खांबाला किती वेळेत ओलांडेल ?
Q.5 त्रिकोणाच्या बाजू अनुक्रमे 8 सेमी, 15सेमी, 17सेमी, आहे तर त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती चौसेमी ?
Q.6 एका संख्येची 1/5 ही 81 आहे. तर त्या संख्येचे 68% म्हणजे किती ?
Q.7 7 टेबल व 12 खुर्च्याची किंमत रु.48250 आहे. तर 21 टेबल आणि 36 खुर्च्याची किंमत किती ?
Q.8 3375 या संख्येचे घनमूळ किती ?
Q.9 2800 रुपये मुदलाचे 2 वर्षाचे सरळव्याज 840 रुपये झाले तर द.सा.द.शे. व्याजचा दर किती असेल ?
Q.10 10 मुलांना 20 किलो साखर 30 दिवस पुरते, तर एका मुलाला 2 किलो साखर किती दिवस पुरेल ?
0 Comments