वर्णमाला किंवा मुळाक्षरे
मराठी ही महाराष्ट्राची मातृभाषा आहे.मराठी भाषेची लिपि ही देवनागरी असून जसे इंग्रजी भाषेत A पासून z पर्यन्त 26 मुळाक्षरे आहे तसेच मराठी भाषेत सुद्धा एकूण 48 मुळाक्षरे आहेत.आज आपण मराठी भाषेतील वर्णमालेचा परिचय करून घेणार आहोत.
Table of Contents
1.वर्ण म्हणजे काय ?
2.अक्षर म्हणजे काय ?
3.शब्द म्हणजे काय ?
4.वाक्य म्हणजे काय ?
5.व्याकरण म्हणजे काय ?
6.मराठी वर्णमाला
7.स्वर व स्वराचे प्रकार
8.व्यंजन व व्यंजनाचे प्रकार
वर्ण : तोंडावाटे बाहेर पडणाऱ्या ध्वणींना वर्ण असे म्हणतात.
अक्षर: आवाजाच्या किंवा ध्वनीच्या प्रत्येक खुणेला अक्षर असे म्हणतात.
शब्द: ठराविक क्रमाने आलेल्या अक्षरांच्या समूहाला काही अर्थ प्राप्त होत असेल तर त्यास शब्द असे म्हणतात.
वाक्य : पूर्ण अर्थाचे बोलणे किंवा अर्थपूर्ण शब्द समूहाला वाक्य असे म्हणतात.
व्याकरण : भाषेचे नियम सांगणार्या शास्त्राला किंवा भाषा शुद्ध करणाऱ्या शास्त्राला व्याकरण असे म्हणतात.
मराठी भाषेतील वर्णमालेत खालील 48 वर्णांचा समावेश होतो.
अ आ इ ई उ ऊ ऋ ऌ ए ऐ ओ औ अं अ:
क ख ग घ ङ
च छ ज झ ञ
ट ठ ड ढ ण
त थ द ध न
प फ ब भ म
य र ल व श ष स ह ळ
मराठी भाषेच्या वर्णमालेत एकूण 12 स्वर आणि 34 व्यंजने आणि 2 स्वरादी असे एकूण 48 वर्ण दिले आहेत तसेच इंग्रजीच्या संपर्कामुळे ॲ, ऑ हे दोन वर्ण आले आहे. 'क्ष' व 'ज्ञ' ही जोडाक्षरे आहेत.
Must Solve ( नक्की सोडवा )
मराठी सराव चाचणी - 3
* स्वर
स्वर : ओठाचा एकमेकांशी किंवा जिभेचा मुखातील कोणत्याही भागाशी स्पर्श न होता तोंडावाटे जे ध्वनि बाहेर पडतात त्यांना स्वर असे म्हणतात. स्वरांना स्वतंत्र उच्चार असतो
स्वराचे प्रकार
स्वराचे एकूण तीन प्रकार पडतात ते खालीलप्रमाणे
1) ऱ्हस्व स्वर : ऱ्हस्व स्वरांचा उच्चार आखूड असतो.
उदा. अ, इ, ऋ, ऌ
दीर्घ स्वर : दीर्घ स्वरांचा उच्चार लांबट असतो.
उदा. आ, ई, ऊ
2) संयुक्त स्वर : दोन स्वर एकत्र येऊन बनलेल्या स्वरांना संयुक्त स्वर असे म्हणतात.
उदा. ए, ऐ, ओ, औ
ए = अ + इ किंवा ई
ऐ = आ + इ किंवा ई
ओ = अ + उ किंवा ऊ
औ = अ + उ किंवा ऊ
3) सजातीय स्वर व विजातीय स्वर : एकाच उच्चार स्थांनामधून जाणार्या स्वरांना सजातीय स्वर असे म्हणतात..
उदा. 1) अ - आ 2) इ - ई 3) उ - ऊ
भिन्न उच्चार स्थांनामधून उच्चारल्या जाणार्या स्वरांना विजातीय स्वर असे म्हणतात.
उदा. 1)अ - इ 2) अ - उ 3) उ - ई 4) इ -ऊ
* स्वरादी : अं, अ: अनुस्वार, विसर्ग या दोन वर्णाचा उच्चार करण्यापूर्वी एखाद्या स्वराचा उच्चार करावाच लागतो, म्हणून ज्याच्या आधी स्वर आहे त्याला स्वरादी असे म्हणतात.
Must Solve ( नक्की सोडवा )
मराठी सराव चाचणी - 1
व्यंजने
व्यंजनाचा उच्चार करताना जिभेचा तोंडातील इतर अवयवांना स्पर्श होतो व शेवटी स्वरांचे सहाय्य घ्यावे लागते. मराठी वर्णमालेत एकूण 34 व्यंजने आहेत. ती खालीलप्रमाणे
क ख ग घ ङ
च छ ज झ ञ
ट ठ ड ढ ण
त थ द ध न
प फ ब भ म
य र ल व श ष स ह ळ
व्यंजनाचे प्रकार
1) स्पर्श व्यंजने : या व्यंजनांचा उच्चार करताना फुफ्फुसातील हवा तोंडावाटे बाहेर पडताना जिभ, कंठ, दात ताल, ओठ यांच्याशी त्यांचा स्पर्श होतो म्हणून त्यांना स्पर्श व्यंजने म्हणतात. क पासून ते म पर्यंत असणारी सर्व व्यंजने ही स्पर्श व्यंजने आहेत.
2) अनुनासिक : या वर्णाचा उच्चार नसिकेतून म्हणजे नाकातूनही होतो म्हणून त्यांना 'अनुनासिक वर्ण' असे म्हणतात.
उदा. ङ, ञ, ण, न, म ही अनुनासिके आहेत.
3) कठोर व्यंजने व मृदू व्यंजने जी व्यंजने उच्चार करावयास कठीण असतात त्यांना कठोर व्यंजने असे म्हणतात.
क, ख, च, छ, ट, ठ, त, प, फ, ही कठोर व्यंजने आहेत.
ज्या व्यंजनांचा उच्चार करावयास सोपा असतो त्यांना मृदू व्यंजने असे म्हणतात.
ग, घ, ज, झ, ड, ढ, द, ध, ब, भ, ही मृदू व्यंजने आहेत.
4) अर्धस्वर : य, र, ल, व यांची उच्चारस्थाने अनुक्रमे इ, उ, ऋ, ऌ या स्वरांच्या उच्चारस्थानांसारखीच आहेत म्हणून त्यांना अर्धस्वर असे म्हणतात.
5)उष्मे किंवा घर्षक : श, ष, स, या वर्णाचा उच्चार करताना उष्णता निर्माण होते म्हणून त्यांना उष्मे किंवा घर्षक असे म्हणतात.
6)महाप्राण व अल्पप्राण : 'ह' या वर्णाचा उच्चार करताना फुफ्फुसातील हवा तोंडावाटे जोराने बाहेर फेकली जाते, म्हणून त्यांना महाप्राण असे म्हणतात. अशा 'ह' मिसळून झालेल्या वर्णांना महाप्राण वर्ण म्हणतात. व उरलेल्या वर्णांना अल्पप्राण वर्ण म्हणतात.
महाप्राण वर्ण : ख, घ, छ, झ, ठ, ढ, थ, ध, फ, भ हे महाप्राण वर्ण आहेत.
श, ष, स, ह यांचा उच्चारही वायूंच्या घर्षणाने होतो, म्हणून त्यांनाही महाप्राण वर्ण असे म्हणतात. एकूण 14 महाप्राण वर्ण आहेत.
अल्पप्राण वर्ण : क, ग, ङ, च, ज, ञ, ट, ड, ण, त, द, न, प, ब, म, य, र, ल, व, ळ
* 'ळ' हा स्वतंत्र वर्ण मानला जातो.
* 'क्ष' व 'ज्ञ' ही जोडाक्षरे आहेत.
0 Comments