New update

6/recent/ticker-posts

लिंगविचार - मराठी व्याकरण / Marathi grammar

                       
namche ling in marathi

 लिंग

  " कोणतीही वस्तु अथवा घटक पुरुष जातीची आहे की स्त्री जातीची आहे किंवा दोन्हीही नाही असे ज्यावरुन कळते त्याला त्या शब्दाचे लिंग म्हणतात. "

लिंगाचे प्रकार :

1) पुल्लिंग : जेव्हा  एखाद्या शब्दातून  पुरुष  जातीचा बोध असेल  तेव्हा  त्या शब्दाचे लिंग पुल्लिंग आहे मानले जाते. "

2) स्त्रीलिंग :जेव्हा  एखाद्या शब्दातून स्त्री जातीचा बोध असेल तेव्हा त्या शब्दाचे लिंग स्त्रीलिंग आहे असे मानले जाते."  

3) नंपुसकलिंग : जेव्हा एखाद्या शब्दातून पुरुष अथवा स्त्री जातीचा बोध होत नसेल तेव्हा त्या शब्दाचे लिंग नंपुसकलिंग आहे असे मानले जाते. "


 साधारणतः लिंग ओळखळण्यासाठी आपण  शब्दापुढे तो,ती,ते लावून त्या शब्दाचे लिंग ओळखू शकतो . 

उदा : 
१) दगड 
उत्तर :  तो दगड, म्हणजे दगड हा शब्द पुल्लिंगी आहे. 

२) शाळा 
उत्तर : ती शाळा, म्हणजे शाळा हा शब्द स्त्रीलिंगी आहे. 

३) पुस्तक 
उत्तर :ते पुस्तक,म्हणजे पुस्तक हा  शब्द नंपुसकलिंगी आहे . 

पुढे  काही  शब्दाची  स्त्रीलिंगी रूपे दिली आहे.ती अभ्यासा...


पुल्लिंगी रूप स्त्रीलिंगी रूप
मुलगा मुलगी
घोडा घोडी
कुत्रा कुत्री
पोरगा पोरगी
वानर वानरी
दास दासी
राजा राज्ञी किंवा रानी
बोका भाटी
मोर लांडोर
उंट सांडणी
बोकड शेळी
बैल गाय
सासू सासरा
भाऊ बहीण
पिता माता
पती पत्नी
बाप आई
वर वधू
नवरा बायको
श्रीमान श्रीमती
भगवान भगवती
ग्रंथकर्ता ग्रंथकर्ती
युवा युवती
विद्वान विदुषी
रेडा म्हैस
पुत्र कन्या
खोंड कालवड
दीर जाऊ
सुतार सुतारीन
माळी माळिण
वाघ वाघीण
बेडूक बेडकी
कुंभार कुंभारिण
rपाटील पाटलीन
तेली तेलीन
लोटा लोटी
खडा खडी
भाकरा भाकरी
आरसा आरसी
गाडा गाडी
दीर जाऊ
धोबी धोबीण
कोळी कोळीण
विधुर विधवा
व्याही विहीण
साधू साध्वी


Post a Comment

0 Comments